Tiranga Times Maharastra —
दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली असून सेंगरला नोटीस बजावून उत्तर मागवण्यात आलं आहे. सीबीआयने या जामिनाविरोधात अपील दाखल केलं होतं. न्यायालयाने नमूद केलं की हा नाबालिग पीडितेशी संबंधित अत्यंत गंभीर गुन्हा असून ट्रायल कोर्टाने याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. चार आठवड्यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
उन्नाव रेप प्रकरणात दोषी ठरलेल्या कुलदीप सिंह सेंगरला दिलेल्या जामिनावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती देत मोठा धक्का दिला आहे.
